Pages

Wednesday, July 20, 2011

घारापुरीची लेणी

घारापुरीची लेणी ही महाराष्ट्रामधील मुंबईनजीकच्या घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्मिण्यात आली आहेत. १९८७ साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला.

Monday, July 18, 2011

कान्हेरी गुहा, बोरीवली

कान्हेरी गुहा या महाराष्ट्रात मुंबईमध्ये उत्तर बोरीवलीजवळ असलेल्या गुहा आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मधोमध वसल्या आहेत. कान्हेरी या शब्दाचा उगम कृष्णगिरी (अर्थ: काळा डोंगर) या संस्कृत नावापासून झाला आहे.[

प्रतापगड

सागरगड

तैलबैला


तैलबैला हा जुन्या काळातील कोकणातून सवाष्णी घाटावरून येणाऱ्या पायवाटेवरील वॉच टॉवर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक अवघड मार्गाचा फायदा घेऊन वर लपून बसत
. त्यामुळे ब्रिटिश सरकारने सुरुंग लावून मधील पायऱ्या उद्‌ध्वस्त केल्या आहेत. रॉक क्‍लाइबिंगसाठी लेफ्ट इनर व आऊटर आणि राइट इनर व आऊटर अशा विविध श्रेणींतील वॉल्स आहेत. लेफ्ट इनर हा त्यातील सर्वांत सोपा मार्ग आहे. लेफ्ट इनर व राईट इनरच्या खिंडीत पिण्याच्या पाण्याचे स्वच्छ टाके आहे. खिंडीत देवाच्या मूर्ती आहेत.

खिंडीत देवाच्या मूर्ती आहेत.
घनगड आणितैल बैला





घनगडावरून दिसणारा तैलबैला

घनगड

घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. इगतपुरी स्टेशनच्या उत्तरेला कावनई किल्ल्याच्या अगदी विरुद्ध दिशेला, उत्तरेला घनगड डोंगररांगेची शिखरे दिसतात. घनगड किल्ला अगदी मध्यभागी आहे. चढायला अवघड. इगतपुरीहून अगदी सकाळची नाशिकला जाणारी बस घ्यावी आणि अर्ध्या अंतरावर असलेल्या वाढिवरे फाट्याला उतरावे. दोन किलोमीटर अंतरावरील वाढिवरे गांवात जावे. तिथून पाच किलोमीटरवर असलेल्या घनगड-सांन्सी डोंगररांगेच्या पायथ्याला पोहचावे. पश्चिमेला डाव्या हाताला अघेरा आहे. तिथून घनगडच्या मध्यभागी पोचता येते. त्याहून वर जाणे, कोसळलेल्या खडकांमुळे बरेच अवघड आहे. नवशिक्यांनी योग्य मार्गदर्शनाखेरीज प्रयत्न करू नये. तिथे डोंगराखालून एक लांबलचक रहस्यमय भुयार जाते. विरुद्ध बाजूला उतरून पूर्वेला उजवीकडे डोंगरमाथ्यावरूनच आंबलीमाथ्याला जाता येते. तेथून त्र्यंबकेश्वरचा डोंगर छानपैकी दिसतो. अघेराच्या डावीकडे अंगठ्यासारखा दिसणारा डांग्या माथा आहे. डांग्याच्या पायथ्यापासून नाशिक जिल्ह्यातल्या नाण्यांच्या संग्रहासाठी प्रसिद्ध अशा अजनेरीला जाणे शक्य आहे.
मुळशीच्या पश्चिमेला एक मावळ भाग आहे यालाच 'कोरसबारस' मावळ म्हणतात.याच मावळात येणारा हा घनगड.आड बाजूला असलेला हा किल्ला मात्र आपल्यासारख्या ट्रेकर्सला नेहमीच खुणावत राहतो.येथील जनजीवन शहरी सुखसोयींपासून दुरावलेले.
इतिहास :
किल्ल्याच्या बद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही.मात्र किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि
नंतर मराठ्यांकडे आला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
किल्ल्यावर प्रवेश केल्यावर डाव्या हाताला असणारी टेकडीवर जाणारी वाट पकडावी.या वाटेने वर जातांना एका पडक्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो.गडावर पडक्या घरांचे अवशेष आहेत.पाण्याची एक ते दोन टाकी आहेत आजमितिस मात्र ती फुटलेली आहेत.बाकी किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत.किल्ल्यावरून सुधागड,सरसगड अणि तैलबैला ची भिंत हा परिसर दिसतो.तसेच नाणदांड घाट ,सव्वष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुध्दा दिसतात.

गडावर जाण्याच्या वाटा :
. ऐकोलेमार्गे
किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे अणि ती ऐकोले गावातूनच वर जाते.मुंबईकरानी अणि पुणेकरांनी लोणावळा गाठावे.लोणावळ्याहून भाबुर्डेकडे जाणारी एस टी पकडावी.लोणावळा ते भांबुर्डेहे अंतर ४० कि.मी चे आहे.भांबुर्डेगावातून थेट ऐकोले गावात यावे .भांबुर्डेते ऐकोले हे साधारणतः अंतर २० मिनिटाचे आहे.ऐकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे.गावातून बाहेर पडल्यावर डावीकडची वाट पकडावी.ही वाट थेट किल्ल्यावर जाते.यावाटेने पुढे जातांना गारजाई देवीचे मंदिर लागते.या मंदिरात ''श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची '' असा शिलालेख कोरलेला आहे.मंदिराच्या समोरच एक तोफगोळा पडलेला आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूनेच किल्ल्यावर जाणारी वाट आहे.येथून थोडाच वेळात आपण एका कातळकडापाशी येऊन पोहचतो.गडावर जाणारी वाट इग्रजांनी सुरुंग लावून चिणून काढली आहे.१५ फुटाच्या ह्या कडावर थोडे प्रस्तरारोहण करून चढून जावे लागते.आवश्यक असल्यास १५ फुटाचा दोर लावावा.हा कडा पार केला की आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो.













हरिश्चंद्रगड

महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहनसह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. काळातील शिवमंदिर आहे.

१७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली

मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.

हा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.
सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे
या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील यु 'U' आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन बाह्य गोल आकाराचा आहे. समोरुन बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो.

कर्नाळा किल्ला

लिंगोबाचा डोंगूर... दुर्ग कर्नाळापनवेल विभागात येणारा आणि रायगड जिल्ह्यात मोडणारा हा किल्ला त्याच्या अंगठा सारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेतो.कर्नाळ्या खालचे अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे.
इतिहास :
किल्ल्यांमध्ये असणा-या टाक्यांवरून हा सातवाहनकालीन असावा असे वाटते मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये किल्ला घेतला. पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणा-या २३ किल्ल्या मध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. यानंतर सन १६७० नंतर महाराजांच्या सैन्याने छापा घालून कर्नाळा किल्ला सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मोगलांनी घेतला त्यानंतर तो पेशव्यांकडे गेला. सन १८१८ मध्ये जनरल प्रॉथरने हा किल्ला घेतला.

गडावर जाण्याच्या वाटा :
मुंबई - गोवा मार्गाने : मुंबई - गोवा मार्गाने पनवेल सोडल्यानंतर शिरढोण गाव लागते. या गावानंतर लगेसच पुढे कर्नाळ्याचा परिसरलागतो. महामार्गाच्या डावीकडेच शासकीय विश्रामधाम आणि काही हॉटेल्स आहेत. एस.टी बस येथे थांबते. समोरच असणा-या हॉटेलजवळून किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. वाट चांगली प्रशस्त आहे. साधारण किल्ल्यावर पोहचण्यास अडीच तास पुरतात. वाटेतच बाजूला पक्षी संग्रहालय आहे.
रसायनी - आपटा मार्गाने : रसायनी - आपटा मार्गाने आकुळवाडी गाव गाठावे. या गावातून येणारी वाट मुख्य वाटेला येऊन मिळते.