तैलबैला हा जुन्या काळातील कोकणातून सवाष्णी घाटावरून येणाऱ्या पायवाटेवरील वॉच टॉवर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक अवघड मार्गाचा फायदा घेऊन वर लपून बसत. त्यामुळे ब्रिटिश सरकारने सुरुंग लावून मधील पायऱ्या उद्ध्वस्त केल्या आहेत. रॉक क्लाइबिंगसाठी लेफ्ट इनर व आऊटर आणि राइट इनर व आऊटर अशा विविध श्रेणींतील वॉल्स आहेत. लेफ्ट इनर हा त्यातील सर्वांत सोपा मार्ग आहे. लेफ्ट इनर व राईट इनरच्या खिंडीत पिण्याच्या पाण्याचे स्वच्छ टाके आहे. खिंडीत देवाच्या मूर्ती आहेत.









सुरेख :)
ReplyDelete